प्राणघातक हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी दोन तासात जेरबंद केलेले आहे.गुन्हे शाखा युनिट १ ने आरोपीला अटक केलेली आहे.
फिर्यादी हे त्यांचे भाऊ आरीफ महेबुब खान, वय-३५ वर्षे, रा. लेन नं. २३ शिवनेरी नगर, कोढवा खुर्द, पुणे याचे सह दुचाकीचे रिपेअरींगचे काम करीत असतांना यातील आरोपीने जुन्या भांडणाचा राग मनात धरून, त्याचेसोबत असलेल्या इतरांनी आरीफ यास शिवीगाळ करून त्याचे कानाखाली चापट मारुन इसको बहुत मस्ती आयी है, आज इसको खत्म कर देंगे असे म्हणुन धारधार हत्याराने आरीफ यास जीवे ठार मारण्याच उद्देशाने त्याचे डोक्यात व पाठीवर चार करुन जखमी केले आहे. तसेच सदर ठिकाणी पडलेले साहित्य उचलून आरिफ याचे अंगावर फेकून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवीगाळ व आरडा-ओरडा करुन त्यांचे हातातील धारदार हत्यारे हवेत भिरकावून सदर परिसरात नागरीकांमध्ये मितीचे वातावरण निर्माण केले आहे..
आरोपी खेड-शिवापुर येथे पुणे जिल्हा सोडुन पळुन जाण्याच्या उद्देशाने थांबला आहे अशी बातमी पोलीस अंमलदार, शंकर कुंभार यांना प्राप्त झाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने युनिट १ चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शब्बीर सैय्यद यांना माहिती कळविली.त्यांनी ही बातमी वरिष्ठांना कळवुन स्वतः व स्टाफ यांच्यासह सरकारी वाहनाने खेड शिवापुर येथे गेले.तेथे त्याचा शोध घेतला असता, तो स्वामी समर्थ बॅग्स फॅक्टरी आऊटलेट जवळ खेड-शिवापुर येथे संशयित रित्या थांबलेला मिळुन आला.त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव व पत्ता विचारता, त्याने त्याचे नाव वसीम ऊर्फ लाल अब्दुल रशीद हजारी ( वय-३९ वर्ष, रा. साहरा अपार्टमेंट, नवाजिश पार्क, कोंढवा, पुणे ) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे नाना पेठ दर्गा चौक येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्या संदर्भात विचारणा केली.त्याने त्याची पत्नी असमा हिच्याशी आरिफ खान याने ओळखीचे संबंध ठेवल्याचा राग मनात ठेवला.आणि त्याने स्वतः त्याची पत्नी, मुलगा अकलाख व मित्र जमीर यांचेसह आरिफ खान याच्यावर पालघनने हल्ला करून त्यास जखमी केल्याचे सांगितले.
सदर बाबत खात्री होताच त्यास ताब्यात घेवुन युनिट १ कार्यालय येथे आणले. दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे पॅन्टच्या खिश्यात मोबाईल मिळुन आला असुन गुन्हयाच्या पुराव्याच्या अनुषंगाने जप्त करून सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्या बाबत समर्थ पोलीस ठाणे भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, मपौका ३७ (१) (३) क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ३ व ७ च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वरील आरोपी हा कोंढवा पोलीस ठाणे येथील मोक्यातील गुन्हयातुन ०४ महिन्यापुर्वी जामीनावर सुटलेला आहे. सदर आरोपी वर एकुण ०५ गुन्हे दाखल आहे.












