परभणी : मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून दौरा करत आहेत. या दौऱ्या दरम्यान स्थानिकांशी संवाद साधत ते आरक्षणाबाबत चर्चा करत आहेत. आज मनोज जरांगे पाटील परभणीत आहेत. यावेळी त्यांनी उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मराठा समाजाबद्दल देवेंद्र फडवणीस यांच्या मनात द्वेष आहे. फडवणीस तुम्ही माझ्यासोबत आठ दिवस उपोषण करा, तुमची ढेरी कमी होईल तुम्हाला उपोषणाची किंमत कळणार नाही. फडवणीस यांनी उत्तर द्यावे. अंतरवाली मधील महिला मध्ये तुम्हाला आई, बहीण दिससी नाही का? गृहमंञी म्हणून वागता आता तुम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या चांगलाच समाचार घेतला,गिरीश महाजन म्हणतो माझे लाड केले… काय लाड केले ? क़ॉफी पाजली का?
एकनाथ शिंदे साहेबांचा मराठ्यांनी सहा महिन सन्मान केला. मी म्हणायचो आरक्षण देतील तर एकनाथ शिंदे साहेबच देतील पण एकनाथ शिंदे मराठ्यांच्या नजरेतून उतरले, असं मनोज जरांगे म्हणाले.
माझा जीव जरी गेला तरी …
मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले. २० वर्षांपूर्वी यांच्याकडे मोटार सायकल नव्हती तुम्ही राजकारण करा. पण आधी आरक्षण द्या देवेंद्र फडवणीस कीती दिवस दडपशाही करतात ते बघू. आता पाच ते साहा कोटी मराठ्यांनी एकञ यायचे. जगातील सर्वात मोठी सभा असणारा आहेत. १० टीम सध्या सभेसाठी जागा शोधत आहे. या सभेला परभणीच्या मराठा समाजाने झाडून पुसून एकञ यायचे आहेत. उद्यापासून समाजाणे कामाला लागायचे. माझा जीव जरी गेला तरी मराठा समाजाच्या लेकरांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय मागे हटत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.