पुणे : खुनाच्या प्रकरणातील आरोपीला पळून जाताना पोलिसांनी अटक केली आहे. कोंढवा परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. १५ जुलै रोजी आरोपीने दोन जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात फिर्यादी यांनी तक्रार दाखल केली आहे. सदर गुन्ह्याचा पोलीस तपास करत होता.
फिर्यादी हे त्यांच्या मुलीसह घरात असताना आरोपी प्रदीपकुमार नारीया जुन्या भांडणाच्या कारणांवरुन फिर्यादी व त्यांच्या मुलीला शिवीगाळ केली व त्यांना ठार मरणाच्या उद्देशाने लोखंडी हत्याराने त्यांना मारुन गंभीर जखमी केले होते. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०७, ५०४,३२३ महाराष्ट्र पोलीस अधि.कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना आरोपीचा शोध घेणेबाबत आदेश जारी केले होते. त्यानुसार पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना आरोपी हा केदारीनगर, कोंढवा भागात फिरत असुन तो उत्तरप्रदेशला पळुन जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहीती मिळाली. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी केदारीनगर, कोंढवा, पुणे भागात आरोपीचा शोध घेतला व आरोपी प्रदीपसिंग बुट्टे नारिया, (वय ३० वर्षे, कोंढवा) अटक करण्यात आली आहे. आरोपी मूळचा शहारी दाऊदपुर, जालौर, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ – २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर श्री. नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्री.विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीशकुमार दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, वर्षा तावडे, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.
फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या












