पुणे : फळबाग उत्पादक महिला शेतकरी व उद्यान कृषी क्रांतीच्या जनक डॉ. भाग्यश्री पाटील यांना मानाचा सन २०२४ चा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार जाहीर झाला होता.
त्या अनुषंगाने प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर येऊन ग्रामगीताचार्य सौ.पौर्णिमा ताई सवाई, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप काळे तसेच राजीव गांधी कृषि विज्ञान प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री प्रकाश दादा साबळे यांच्या शुभहस्ते मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
फळबाग उत्पादक शेतकरी डॉ भाग्यश्री पाटील व डॉ स्मिता योगेश जाधव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून माळरानावर ३६००० झाडांद्वारे नंदनवन फुलवले आहे. ठिबक सिंचनाच्या साह्याने केशर आंबा जातीचे सेंद्रीय निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी काटेकोर नियोजन आंतरराष्ट्रीय मानांकन पूर्ण केल्यामुळे परदेशामध्ये आंब्याची व डाळिंबाची निर्यात केली जाते.
याप्रसंगी बोलताना डॉ भाग्यश्री पाटील म्हणाल्या “की माझे पती डॉ प्रसाद दत्ताजीराव पाटील व डॉ स्मिता योगेश जाधव हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांनी दिलेले प्रोत्साहन व मोलाचे सहकार्य यामुळे हे शक्य झाले”. या सन्मानातून माझ्या कार्याला अधिक बळ मिळाले आहे असे डॉ पाटील म्हणाल्या कृषी विभागाचे कृषी अधिकारी विनायक जगताप यांच्या मार्गदर्शना खाली मँगो नेटची नोंदणी करून सेंद्रिय पद्धतीने निर्यातक्षम उत्पादन काढण्यात आले असुन सद्या परदेशात आंब्याची निर्यात केली जात आहे या पुरस्कारामध्ये कृषि विभागाचाही मोलाचा वाटा आहे. तसेच फळ बागेचे नियोजन करताना सुनील पाटील यांचेही सहकार्य लाभले”.
पुणे जिल्ह्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी डॉ भाग्यश्री पाटील व डॉ स्मिता जाधव यांनी इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न व मार्गदर्शन करतात.
आंबा फळ पिकाबरोबरच डाळिंब, सीताफळ, चिकू, पेरू, द्राक्ष इत्यादी फळ पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. याप्रसंगी राजीव गांधी प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य राहुल तायडे, दत्ताभाऊ किटुकले, निलेश उभाड, गणेश भाऊ कदम , कुंडलिक नाना खुटवड , पंडित भाऊ दोरगे, सदानंद दोरगे, नाथा आबा दोरगे , दशरथ खुटवड ,भाऊसाहेब दोरगे , दिलीप तात्या दोरगे , रघुनाथ दोरगे , दत्तात्रय दोरगे , संतोष दोरगे , अशोक लाटकर, प्रकाश दोरगे, धनंजय दोरगे, हरिभाऊ खुटवड, माणिकराव दोरगे, तुषार दोरगे, दिपक दोरगे, बाळासाहेब जाधव, राहुल कुदळे आदी शेतकरी मंडळी उपस्थित होती.