अभिनेञी केतकी चितळे गेल्या अनेक दिवसांपासून अधिक चर्चेत आली आहे.केतकी हीनं पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट केली आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे नुकतीच फडणवीसांवर केलेल्या विधानवरून तिनं भाष्य केलं आहे. अभिनेञी केतकी चितळेनं सोशल मीडिया पोस्ट करताना म्हटलं की कालचा दिवस फार इंडरेस्टींग होता.
एके ठिकाणी बरीच वर्षे शिव्या घातल्यावर ब्राह्मण तुष्टीकरण करताना स्व:चा कानांनी ऐकले व डोळ्यांनी बघितल, आणि दुसरीकडे,काही किलोमीटर अंतरावर एका मोर्चा धारक महापुरूषांनी एका राजकारणी नेत्यांना ब्राह्मण म्हणून अपशब्द वापरले अशी बातमी ऐकली जय महाराष्ट्र असे म्हणून गप्प बसावे का या सर्कशीत असलेल्या कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकावे कळत नाहीये.असो … जय हिंद वंदमातरम् भारत माता की जय दरम्यान,मनोज जरांगे यांनी काल आंतरवली सराटीत उपोषणादरम्यान अचानक आक्रमक झाले आणि त्यांनी गृहमंञी देविंद्र फडणवीसांवर याच्यावर षडयंञ करत असल्याची टीका केली आहे.फडणवीसांवर टीका करताना त्यामुळं हे प्रकरण आता मराठा विरूध्द ब्राह्मण अशा दिशेनं जातंय की काय असं वाटू लागलं होतं.
यानंतर जरांगेंनी आपल्यावर विष प्रयोग करून मारण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत मला मारायचचं असेल तर मी स्वत: फडणवीसांच्या सागर बंगल्यावर येतो, असा पविञा घेत जरांगे ताडकन उठून मुंबईच्या दिशेनं निघाले होते. पण आज सोमवार सकाळी त्यांनी युटर्न घेत अंबड तालुक्यातील भांबेरी गावात मुक्काम करून पुन्हा अंतरवलीकडे गेली आणि आपल्या नेहमीच्या जागी उपोषणाला बसले.