पुणे: आपल्या भारत देशाला समृद्ध परंपरा आहे. सर्व धर्मीय सण व उत्सवाच्या माध्यमातून ही परंपरा अधोरेखित होते. अशा उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येतो व आपल्या विचारांची देवाण-घेवाण करतो. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करीत, हे उत्सव एकमेकांचा आदर करीत उत्साहात साजरे करतोय. ही बंधुत्वाची व राष्ट्रीय एकतेची भावना उत्तरोत्तर वाढत राहो. अशा सदिच्छा परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त आर राजा यांनी दिल्या.
शिवसमर्थ संस्थेच्या वतीने हडपसर येथील महात्मा फुले वसाहत मध्ये विद्यार्थ्यांसाठी रोजे इफ्तार या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उपक्रमाचे हे सहावे वर्ष होते. यावेळी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना पोलीस उपायुक्त आर राजा यांनी संबोधित केले. याप्रसंगी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, सहाय्यक फौजदार दिनेश शिंदे, गाडीतळ येथील गुरुद्वाराचे ग्यानीजी, डॉ. बच्चूसिंग टाक, सामाजिक कार्यकर्ते बंडू पाडळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसमर्थ संस्थेच्या अध्यक्षा मनीषा वाघमारे, सुरज अग्रवाल, पार्थ वाघमारे, अभ्यासिका शिक्षिका सना पठाण, प्रियांका पाटील, नाजमीन मुजावर, नेहा टाक, शुभांगी कोल्हार, वैभवी विधाते, श्रावणी भोसले, नेहा शेख, अपेक्षा गायकवाड यांनी केले.
रोजे इफ्तार नंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास डॉ. शंतनू जगदाळे व सामाजिक कार्यकर्ते अक्षय आबनावे, आलमगीर मस्जिदचे मेहबूब शेख, हमीद शेख यांची उपस्थिती होती.