सोमवारी कोंढवा पोलिस स्टेशन येथे बकरी ईद व आषाढी एकादशी निमित्त मा. अप्पर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. रंजन शर्मा, मा. सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग पुणे शहर श्री शाहु राजे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीत गुरुवारी बकरी ईद आणि आशादी एकादशीच्या पार्शवभूमीवर होणाऱ्या उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये यासाठी बैठकीत एम.एस.ई.बी. चे श्री. महेश देशमुख, महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता, पुणे महानगर पालिकेचे डेप्युटी इंजिनिअर, श्री. आर.एस. तिखे, पुणे मनपा स्लॉटर हाऊस येथील श्री.बाळु थोरात, मनपा आरोग्य खातेतील, मुजावर, अग्निशामक दल स्टेशन ऑफिसर, समीर शेख, मनपा पाणीपुरवठा विभाग श्री सोमनाथ काटकर यांच्या समवेत चर्चा झाली. सदर बैठकीत सणाच्या दिवशी जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध करुन नागरिकांना कुठलेही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता व इतर बाबींवर चर्चा झाली.
सदर बैठकीत कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीतील जाहिद इब्राहिम शेख, महाराष्ट्र ॲक्शन कमिटी, संस्थापक अध्यक्ष, कारी मोहम्मद इद्रीस अन्सारी, पुणे शहराध्यक्ष जमीते उलेमा, माजी नगरसेवक, रईस सुंडके, समीर अन्सार शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक, पुणे शहराध्यक्ष हाजी फिरोज शेख, युवराज लोणकर, आबिद सय्यद, हाजी जफर कौसर बाग मज्जिद ट्रस्टी, जावेद पठाण व इतर ३५ ते ४० जनसमुदाय उपस्थित होता.
बकरी ईद व आषाढी एकादशीच्या पार्शवभूमीवर कोंढवा पोलीस ठाण्यात बैठक












