पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ११ : बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच चोरांचा सामना करावा लागतो.आता या चोरीच्या घटनेत बऱ्याच प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. अशीच एक घटना शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
या प्रकरणी एका महिलेने एका अज्ञात इसमा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी या मनपा पुणे ब्रिज खालून बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या उजव्या हातातील एक लाख वीस हजार किमतीची सोन्याची पाटली चोरून नेली आहे.
आरोपीवर भादवी कलम ३७९ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला ताब्यात घेण्यात आले नाही.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार काळे हे करत आहेत.












