पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०९ : बसमधील गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरल्याची घटना समोर आली आहे. ही घटना फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी यशोदिप महागरे ( वय २३ वर्ष रा. कसबा पेठ पुणे ) यांनी प्रविण प्रेकुमार कावाडी ( वय २१ वर्ष रा.मु.पो. गिद्देलूर, आंध्रप्रदेश ), सुभाष गंगाराजू ओबराय ( वय २२ वर्ष रा. मु.पो. गिद्देलूर, आंध्रप्रदेश ) या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
दि. ०८ रोजी फिर्यादी हे वसंत टॉकीज येथील बसस्टॉप वरून बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत आरोपींनी फिर्यादी यांचा १५,००० किमतीचा मोबाईल त्यांच्या पँटच्या उजव्या खिशातून जबरदस्तीने काढून चोरून नेला आहे.
आरोपींवर भादवी कलम ३९२,३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी हे करत आहेत.












