पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०२ : नवऱ्याने चारित्र्यावर घेतलेल्या संशयामुळे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.ही घटना हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून एका महिलेने आरोपी जावई कृष्णा शिवाजी उकिरडे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी यांच्या मुलीचे आरोपी याच्या सोबत लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपी हा वारंवार आपल्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दारू पिण्यासाठी राहत्या घराची जमीन विकण्यासाठी सांगून तिला मारहाण करत होता. सततच्या भांडणाला आणि चारित्र्यावरील संशयाला कंटाळून पीडित महिलेने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
आरोपीवर भादवी कलम ४९८ ( अ ),३०६ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला ताब्यात घेण्यात आले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गाढवे हे करत आहेत.












