पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०६ : अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व संशोधक विद्यार्थिना बार्टी मार्फत देण्यात येणारी संशोधन अधिछात्रवृती (फेलोशिप) रजिस्ट्रेशन दिनांक पासून सर्व पात्र विद्यार्थ्यांना देण्यात यावी. या मागणीसाठी बार्टीचे महासंचालक वारे यांना आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
महासंचालक यांनी सदरील निवेदनाची तात्काळ दखल घेत फेलोशीप यादी जी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे ती यादी दोन दिवसात प्रसिद्ध करू असे आश्वासन दिले. तसेच चीफ सेक्रेटरी ल यांच्याशी पत्रव्यवहार करून उर्वरित मागण्या पूर्तता करण्याचे आश्वासन महासंचालक यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिले.
विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी यावेळी दिला. निवेदन दिल्यानंतर
आंदोलक विद्यार्थी यांनी सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी सुदर्शन जगदाळे, अक्षय शिंदे, सुरेखा भोसले ,प्रशांत कांबळे, निरंजन अडागळे, शिवाजी डोलारे ,अमोल मोरे
निलेश वांजळे, चांगदेव नेटके, आकाश मुनियान ,विजय साठे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.












