बीड : बीड वकील संघाची नुकतीच निवडणूक पार पडली आहे. ॲड. प्रशांत राजपुरकर यांची वकील संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
ॲड. राजापुरकर हे १९९८ पासून बीड जिल्हा सत्र न्यायालय येथे वकील या भूमिकेतून सज्ज आहेत. दिवाणी प्रकरणांमध्ये त्यांचा अनुभव उल्लेखनीय आहे. तसेच तडजोडीतून प्रकरणे सोडवण्याचा त्यांचा अधिक कल आहे.
यापूर्वी त्यांनी संघाचे सचिव पद देखील भूषविले आहे.
यावेळी प्रा. सुनील थोरात व अप्पा दळवी यांच्याकडून ॲड प्रशांत राजपुरकर यांचा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला आहे. तसेच यावेळी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत.












