मुंबई । भारतीय क्रिकेट नियामक आयोग (BCCI) ने २०२२-२३ या वर्षासाठीच्या महिला क्रिकेटपटूंचा केंद्रीय करार जाहीर केला आहे.केंद्रीय करारामध्ये एकूण १७ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.एकूण ९ खेळाडूंना बी श्रेणीत आणि ५ खेळाडूंना सी श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे.महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर व्यतिरिक्त सलामीवीर स्मृती मानधना आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा यांना ए ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले आहे.
बीसीसीआयने हरमनप्रीत कौर,स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा यांना महिला क्रिकेटपटूंच्या केंद्रीय कराराच्या यादीत प्रथम श्रेणी ए मध्ये ठेवले आहे,ज्यांना वार्षिक ५० लाख रुपये मिळतील.एकूण ५ खेळाडूंना ब श्रेणीत स्थान मिळाले असून त्यात रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्स,शफाली वर्मा, राजेश्वरी गायकवाड यांच्या नावाचा समावेश आहे.बी श्रेणीतील खेळाडूंना बीसीसीआयकडून वार्षिक ३० लाख रुपये मिळतील.उरलेल्या ९ खेळाडूंना सी श्रेणी मध्ये स्थान मिळाले आहे,ज्यात मेगना सिंग, देविका वैद्य,अंजली सरवानी,पूजा वस्त्राकर,सबिनेनी मेघना,स्नेह राणा,राधा यादव,हरलीन देओल, यासिका भाटिया यांचा समावेश आहे.या श्रेणीतील खेळाडूंना १० लाख रुपये वार्षिक मानधन दिली जाईल.
सात नवे खेळाडू
बीसीसीआयने २०२१-२२ या वर्षाच्या वार्षिक करारामध्ये १७ खेळाडूंचाही समावेश केला होता,परंतु मागील कराराचा भाग असलेल्या सात खेळाडूंचा यावेळी समावेश करण्यात आलेला नाही.या खेळाडूंच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.रेणुका ठाकूर,मेघना सिंह, देविका वैद्य,सबिनेनी मेघना,अंजली सरवानी,राधा यादव आणि यास्तिका भाटिया या आधी केंद्रीय कराराचा भाग नव्हत्या.पण यावेळी त्यांना करारात समाविष्ट करण्यात आले आहे.रेणुका ही एकमेव खेळाडू आहे जिला थेट बी ग्रेड करार देण्यात आला आहे, तर बाकीच्यांना सी ग्रेडमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय करारातून हे खेळाडू बाहेर
पूनम यादव, मिताली राज, झुलन गोस्वामी, तानिया भाटिया,पूनम राऊत, शिखा पांडे,अरुंधती रेड्डी.
श्रेणी-अ (५० लाख रुपये) : हरमनप्रीत कौर, स्मृती मंधा आणि दीप्ती शर्मा.
श्रेणी-ब (३० लाख रुपये) : रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, राजेश्वरी गायकवाड.











