पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०४ : आपण पाहतो की शहरात अनेक ठिकाणी बी.आर.टी स्टेशन स्थापन करण्यात आले आहे. शहरभरात प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा या हेतूने या बी.आर.टी ची निर्मिती करण्यात आली आहे. असे असताना देखील अनेक मार्गांवर दुचाकी आणि चार चाकी वाहने त्यांच्यासाठी प्रवेश बंदी असताना बी.आर.टी मार्गांमधून गाड्या चालवताना दिसतात. यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडत असतात. अनेक बस चालकांना त्यांच्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या अनुषंगाने पिंपरी – चिंचवड आयुक्तालया तर्फे नवे निर्बंध लागू करण्यात येत आहेत. यामध्ये ०१ सप्टेंबर २०२३ पासून पी.एम.पी.एम.एल बस, फायर ब्रिगेड, पोलीस वाहने आणि रुग्णवाहिका ही वाहने वगळता इतर वाहनांसाठी प्रवेश बंद असणार आहे.
नागरिकांनी बी.आर.टी मार्गाचा अवलंब न करता पर्यायी मार्गाचा वापर करावा अन्यथा या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकावर १,५०० / – रुपये दंड आकारण्यात येईल असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.












