पुणे : बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जीवंत काडतुस जप्त करण्यात आली आहे.नामदेव रामभाऊ ढेबे ( वय २२) रा. मेधराज कॉम्पलेक्स धायरी ) आकाश मच्छिंद्र कदम ( वय २३,रा.खडक चौक धायरी) जय संगमेश्र्वर दयाडे ( वय १९,रा.शिवसृष्टी अपार्टमेंट , रायकरमळा धायरी) अशी अटक आरोपींचे नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर यांना गस्त घालीत असताना आरोपींबाबत खबऱ्यामार्फात माहिती मिळाली हे तिघेही रायकर मळा येथील सुरज जाधव यांच्या शेतात झाडाखाली बसलेले असून त्याच्याकडे बेकायदा पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छापा टाकला.
त्याठिकाणी पोलिसांना पाहून आरोपींनी धूम ठोकली. माञ पोलिसांनी पाठलाग करीत काही अंतरावरच त्यांना पकडले. त्यांच्याकडून ५० हजार रुपयांचे देशी बनावटीचे एक पिस्तूल, दोन जीवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर , पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर,पोलीस अंमलदार सचिन गायकवाड,प्रकाश पाटील राजू वेगरे. स्वप्रिल मगर, विनायक मोहिते, मोहन मिसाळ, विजय