पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २१ :अवैध्य रित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमाला दरोडा विरोधी पथक कडून भोसरी परिसरातून अटक करण्यात आली आहे. महेश ऊर्फ अभि विनायक जाधव (वय २५ रा.धावडे वस्ती, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
सदर आरोपी भोसरी स्मशानभूमी परिसरात पिस्टल घेऊन येणार असल्याची गुप्त बातमी पोलीस शिपाई गणेश सावंत, सुमित देवकर यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या कडून १ लाख रुपये किंमतीचे दोन गावठी पिस्टल, एक हजार किंमतीचे एक जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे.
आरोपी विरोधात भोसरी पोलीस स्थानकात भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) महाराष्ट्र कायदा कलम ३७ (१) (३) सहा १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या आधीही भोसरी पोलीस स्थानकात गंभीर दुखापतीचा एक गुन्हा दाखल आहे.
सदर कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे, सहा पोलीस आयुक्त वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त कोपनर, यांच्या मार्दर्शनाखाली दरोडा विरोधी पथकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहा पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस अंमलदार उमेश पुलगाम, विनोद वीर, गणेश सावंत, सुमित देवकरआशिष बनकर, गणेश हिंगे, सागर शेगडे, राजेश कौशल्य, यांनी केली आहे.












