पुणे प्रतिनिधी
बनावट लायसन्स सह अनेक शस्त्र बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या परराज्यातील इसमांना वानवडी पोलीसांनी जेरबंद केल्याची घटना समोर आली आहे.
संतोष जैनाथ शुक्ला ( वय ५० वर्षे, रा. भागीरथी नगर, साडे सतरा नळी, हडपसर पुणे ),रामप्रसाद बुध्दा पासवान ( वय ३५ वर्षे, रा. भिंगारवाडी, ता. पनवेल, जि. रायगड ), राजेश बबलु पासवान ( वय ३५ वर्षे, रा. भरसवा, फतेपुर, अशोक नगर, उत्तरप्रदेश ), दिनेश जगदीश पासवान ( वय ५४ वर्षे, रा. गोपीपुर जरार, जमरावी, जि. फतेपुर, उत्तरप्रदेश ), इम्रान मोहंमद जिमी खान ( वय ३० वर्षे, मुळ रा. राजोरी, ता. काटरंगा, जि.राजोरी, राज्य जम्मु काश्मिर ), मोहंमद बिलाल मोहंमद निसार ( वय ३० वर्षे मुळ रा. मंजापुर, ता. मंजापुर, जि. राजोरी, राज्य जम्मु काश्मिर ), साहिल कुमार चमनलाल शर्मा ( वय २५ रा. मुळ राहणार राजौरी, जम्मु काश्मिर राज्य ), गौतम देशराय शर्मा ( वय २३, रा.मुळ राहणार तेरीयाथ, राजौरी, जम्मु काश्मिर राज्य )अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत आरोपी हे अण्णाभाऊ साठे उद्यानामागे संशयितरित्या एक्टिवा गाडीजवळ कोणता तरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने वावरत असल्याचे समजले.
पोलिसांनी सापळा रचून आरोपींविरोधात कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्या राहत्या घरी गावठी पिस्टल, ८ सिंगल बोर रायफल, २८ जिवंत राउंड, तसेच जम्मु कश्मिर येथील राजोरी व अनंतनाग येथील बनावट लायसन्स सह एकुण रू.४,५६,२४०/- किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
आरोपींवर भादंवि कलम ४६७, ४६८, ४७१ सह १२० ब भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री संदिप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त परि-५, पुणे शहर श्री विक्रांत देशमुख मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री. शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनय पाटणकर, तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, पोहवा. हरीदास कदम, संतोष नाईक, अमजद पठाण, अतुल गायकवाड, यतिन भोसले, अमोल गायकवाड, विठठल चोरमले, विष्णु सुतार, निलकंठ राठोड, व मपोना / सोनम भगत यांनी मिळुन केली आहे.












