पुणे: बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असताना या घटनेचा तपस करत असताना पुणे पोलिसांना मोठी लीड मिळाली आहे. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. याबाबत सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले की, एकदा सर्व बाबी स्पष्ट झाल्या की आपल्याला माहिती दिली जाईल. इतर दोघांचा शोध सुरु आहे.
बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुण तरुणीपैकी तरुणाला मारहाण करुन बांधून ठेवले गेले. त्यानंतर तरुणीवर तिघांनी सामुहिक बलात्कार केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेले काही दिवस पुणे पोलीस दिवसरात्र तपास करीत होते. त्यासाठी पोलिसांची ६० पथके काम करीत आहे. आरोपींची माहिती देणार्यांना १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. अखेर आरोपीपर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले आहे.
मात्र पुणे पोलिसांनी या प्रकरणात अद्याप गोपनीयता बाळगली असून अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज होत असलेल्या नवीन ७ पोलीस ठाण्यांचे उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका आरोपीला ताब्यात घेतल्याचे जाहीर केले आहे.