पुणे शहरातील खडकी वाहतुक विभागाच्या हद्दीत मेट्रोचे काम सुरु असल्याने चर्च चौक ते बोपोडी चौक असा एकेरी मार्ग करण्यात आला आहे. बोपोडी चौक ते चर्च चौक दरम्यान प्रलंबित असलेली सर्व कामे पंधरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे बोपोडी चौक ते चर्च चौक दरम्यान दुहेरी वाहतूक सुरु करण्यात येईल.
वाहनचालकांच्या सोईकरीता बोपोडी चौक ते सी.एफ.व्ही.डी. (फुटबॉल मैदान) दरम्यान दुचाकी व तीनचाकी वाहनांना प्रायोगिक तत्वावर परवानगी देण्यात आली होती. या मार्गावर मेट्रो स्टेशनचे काम सुरु आहे. या रोडवर चर्च चौक ते बोपोडी चौक दरम्यान पाईपलाईनचे काम सुरु होणार आहे. ज्यामुळे वाहतूक कोंडी अथवा एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. याकरीता विजयकुमार मगर, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक, पुणे शहर, यांनी खडकी वाहतूक विभागातील बोपोडी चौक ते चर्च चौक दरम्यान प्रवास करणाऱ्या दुचाकी व तीनचाकी वाहनांकरीता यापुर्वी प्रायोगिक तत्वावर दिलेली परवानगी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार बोपोडी चौकातून पुणेचे दिशेने (चर्च चौकाकडे ) जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात
येत आहे.
तरी प्रवासी आपल्या इष्ट स्थानी जाण्याकरिता बोपोडी चौक, डावीकडे वळून खडकी बाजार, एम.एस.ई.बी. चौक, उजवीकडे वळून चर्च चौक या पर्यायी मार्गांचा वापर करू शकतात
बोपोडी चौक ते सी.एफ.व्ही.डी. मार्ग प्रवाशांसाठी बंद












