पुणे प्रतिनिधी
पुणे दि ३० : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत द्वारका दत्त सदन, मोडक वस्ती येथे (ता.२४) श्रीगणेश ज्वेलर्सच्या दुकानात दुपारी पावणे दोनच्या दरम्यान दोन अनोळखी महिलांनी सोने खरेदीच्या बहाण्याने येऊन, ३,००० रुपये किंमतीचे सोन्याचे एक जोड कानातील झुमके चोरून पसाल झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी दुकानाचे मालक अमित नांगरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
अमित नांगरे यांच्या श्रीगणेश ज्वेलर्स या दुकानात पावणे दोनच्या सुमारास दोन अनोळखी महिला सोने खरेदीकरण्याच्या उद्देशाने येऊन दुकानात वेगवेगळ्या सोन्याचे डिझाईन पाहू लागले असताना दुकानदाराचे लक्ष विचलित करून दोन्ही महिलांनी सोने लंपास केले. सदर घटनेचा सीसीटीव्ही फुटेज वरून पोलीस तपास करीत आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार पाटील करीत आहेत.












