पिंपरी चिंचवड दि.१३ : चाकण येथे शिक्रापूर रोडवर दोन वाहनांच्या धडकेत एकाच मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवार दि.११ रोजी रात्री १२ चे सुमारास घडली आहे.
सदर वाहन चालका विरोधात शिवाजी सुरवसे यांनी चाकण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. प्रसाद संभाजी (सुरवसे वय १९) असे मृत तरुणाचे नाव असून जखमी सुदर्शन योगेश जाधव (वय २१) यांच्या वर उपचार सुरु आहे.
मृत तरुण हा मित्राच्या वाढदिवसाला जात असताना हा अपघात घडला आहे.सदर वाहन चालक हा भर धाव वेगाने येऊन तरुणाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. दिनेश नारायण गोसालकर (वय ५१ रा.वाडा ता.खेड, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरोधात भा.द.वि.कलाम ३०४ (अ) २७९,३३७,३३८,४२७ मोटार वाहन कायदा व १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक बामणे करीत आहे.
भर धाव गतीने वाहन चालवणारा अटकेत












