पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०६ : भावानेच आपल्या बहिणीच्या नवऱ्याला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.ही घटना दि. ०४ रोजी पुणे सातारा रोड वरील अरण्येश्वर येथे घडली आहे.
याप्रकरणी अजिनाथ बटुले ( वय ३०, रा. बिबवेवाडी पुणे ) यांनी आपल्या मेहुण्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मेहुण्याने घरगुती भांडणाच्या कारणावरून त्याच्या जवळील चाकूने त्यांच्या पोटात,पाठीवर,हाताच्या बोटावर वार करून जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
आरोपीवर भादंवि कलम ३०७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक महेश नलवडे हे करत आहेत.












