जळगाव लोकसभा मतदारसंघ… उत्तर महाराष्ट्रातला एक महत्वाचा मतदारसंघ. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होत आहे. त्यात चौथ्या टप्प्यात म्हणजेच १३ मे रोजी जळगावात मतदान होणार आहे. तरी, जळगाव लोकसभा मतदारसंघावर कायम संघाचं पारडं जड राहिलंय. हिंदुत्ववादी विचारधारेला इथला मतदार कायम आपला कल देत आला आहे. त्यामुळे २००४ पासून इथे भाजपचं एकहाती वर्चस्व राहिलं आहे. तरी, येत्या लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या बाजूनं निकाल लागणार की मतदारराजा आपला कल बदलणार? हे निवडणुकीच्या निकालानंतर कळेल.
पण, याच जळगाव लोकसभा मतदारसंघात एक मोठी घडामोड घडली आहे. ते म्हणजे जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसले. सर्वात आधी त्यांनी ठाकरे गटाचे जळगावचे संपर्कप्रमुख आणि विभागप्रमुख संजय सावंत आणि आमदार सुनील राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर प्रभादेवी येथील सामना कार्यालयात जाऊन त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली. त्यानंतर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले.
त्यामुळे तिकीट कापल्यानं भाजपावर नाराज असलेल्या उन्मेश पाटलांनी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरु केल्याचं दिसतंय. ते आणि त्यांची पत्नी ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं कळतंय.
भाजपचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते उन्मेश पाटील यांना भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर उन्मेश पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती आणि त्याच निमित्ताने आज उन्मेश पाटील हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले असल्याचे बोलले जात आहे या ठिकाणी संजय राऊत हे पत्रकार परिषद आटोपल्यानंतर सामनाच्या दिशेने निघाल्यामुळे आता उन्मेश पाटील हे आमदार सुनील राऊत आणि विभाग प्रमुख संजय सावंत यांची भेट घेऊन ते सामनाच्या दिशेने निघाले आहेत. सामनाहून ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत त्यामुळे उन्मेश पाटील हे आज मातोश्रीवर पक्षप्रवेश करतायेत की काय अशी चर्चा सुरू आहे यामुळे भाजपला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे.
तरी, राऊतांची भेट घेतल्यानंतर उन्मेश पाटलांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली, ते पाहूयात-
मी उद्या आरामात तुमच्याशी बोलेन. आता बोलणं उचित नाही. मी उद्या सकाळी तुमच्यासाठी बोलेन. माझी आणि राऊत साहेबांची मागच्या अनेक वर्षांपासून ओळख आहे. आम्ही एकत्र संसदेत होतो, आमची मैत्री आहे. काही गोष्टी राजकारण पलीकडे असतात ही भेट तशीच होती.
-उन्मेष पाटील, खासदार, भाजप
तर, संजय राऊतांनी उन्मेष पाटलांसोबतच्या भेटीवर सूचक प्रतिक्रिया दिली.