
पिंपरी चिंचवड –
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार महेश लांडगे आणि स्थानिक भाजप नेत्यांनी स्वर्गीय आर आर आबा यांची कन्या स्मिता पाटील – थोरात यांची रविवारी (दि ९) रोजी त्यांच्या निवस्थानी भेट घेतली आहे.
स्मिता यांच्याकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाची जबाबदारी येण्याच्या हालचालींना वेग आला होता. या पार्श्वभूमीवर आज भाजप नेत्यांची घेतलेली भेट महत्वाची ठरली आहे.

यावेळी राजकीय वाटचाली बाबत प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती दिली आहे.
पिंपरी चिंचवडच्या सूनबाई असलेल्या स्मिता पाटील या
पिंपरीत आल्यापासून प्रथमच भाजप नेत्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. तसेच मागील महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. या भेटी नंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.











