पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १७ : झूमकार वरून महिंद्रा थारगाडी भाड्याने घेऊन गाडीसह पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
वैजनाथ कारभारी खरमाटे या टुरिस्ट व्यावसायिकाने शैलेशकुमार हिंगु ( रा.४०६, नंदनवन सोसायटी, पुणगाव सुरत ) याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी हे एक टुरिस्ट व्यावसायिक असून ते झुमकार कंपनी साठी आपल्या गाड्या भाड्याने देत असतात. दि. १३/०६/२०२३ रोजी त्यांनी १८,००,००० रुपयांची महिंद्रा थार फोर बाय फोर ही गाडी आरोपी शैलेश कुमार हिंगु याला भाड्याने दिली होती पण आरोपी थार गाडी घेऊन फरार झाला होता. तो गुजरातमध्ये जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचून पालघर मधून त्याला ताब्यात घेतले आहे.
आरोपीवर भादवी कलम ४०६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कदीर देशमुख हे करत आहेत.
सदरची कारवाई ही मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा मा. पोलीस उपायुक्त परि-४ पुणे शहर श्री शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, श्री संजय पाटील यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. विलास सोडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता माळी यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, विजय चंदन पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे, पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, गिरीश नाणेकर, रुपेश पिसाळ, नाना कर्चे, सचिन जाधव, सचिन कदम, योगेश थोपटे, ज्ञानेश्वर आवारी यांचे पथकाने केली आहे.












