टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या दुखापतग्रस्त असून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) तो यातून सावरत आहे. 35 वर्षीय जडेजाने एक दिवस आधी (गुरुवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण केली. दरम्यान, शुक्रवारी तो अचानक प्रकाशझोतात आला, जेव्हा त्याचे वडील अनिरुद्ध सिंग जडेजा यांनी त्याच्याबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या. जडेजाच्या वडिलांनी आपला मुलगा रवींद्र आणि सून रिवाबा यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले.
वडिलांची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होताच जडेजाने X वर पोस्ट करून आपले मौन तोडले. वडील अनिरुद्ध सिंग जडेजाच्या मुलाखतीला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जडेजाने मुलाखतीत जे बोलले होते ते पूर्णपणे नाकारले. त्याचबरोबर या मुलाखतीतून पत्नी रिवाबाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
जडेजाने गुजरातीमध्ये लिहिले की, ‘दिव्य भास्करमध्ये प्रकाशित झालेल्या निरर्थक मुलाखतीत जे काही बोलले गेले ते चुकीचे आणि अर्थहीन आहे. फक्त एका बाजूचा मुद्दा मांडला आहे, ज्याचा मी खंडन करतो. माझ्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे अत्यंत निंदनीय आणि अशोभनीय आहे. माझ्याकडेही बरेच काही सांगायचे आहे जे मी जाहीरपणे न बोलल्यास चांगले होईल. अशी पोस्ट करत जडेजाने त्यांच्या वडीलांचे सर्व आरोप नाकारले.