पुणे प्रतिनिधी
पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा कक्षाने बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या 19 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बुधवार पेठ परिसरातील वेश्या व्यवसायात गुंतलेल्या १० महिला आणि शहरातील विविध व्यवसायात काम करणाऱ्या ९ पुरुषांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार पेठ परिसरात काही परदेशी नागरिक अवैधरित्या राहत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा कक्षाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या एकाही आरोपीकडे भारतात राहण्यासाठी वैध
कागदपत्रे नसल्याचे समोर आले आहे. ते भारत-बांगलादेश सीमेवरून बेकायदेशीरपणे देशात घुसले होते.
आरोपी गेल्या तीन महिन्यापासून या परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांना पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत अटक केली असून फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.












