पुणे । प्रतिनिधी
पुणे दि.२६ : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘लक्ष्य’ या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था हा कार्यक्रम प्रस्तुत करणार आहे.या कार्यक्रमात श्रीता आंबेकर(कुचिपुडी),अमीरा पाटणकर(कथक) आणि दिल्लीच्या अरुपा लाहिरी या भरतनाट्यम नृत्य सादर करणार आहेत.
हा कार्यक्रम रविवार, २९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १८७ वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.












