पुणे प्रतिनिधी
पुणे 30 : लोणी कंद परिसरात शनिवारी पहाटे भारत गॅस कंपनीचा गॅस टँकर उलटला. टँकर भरला होता आणि गॅसची गळती सुरू झाल्याने पोलिस अधिकारी आणि इतर बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी कंद परिसरातील मगर वस्तीजवळ टँकर उलटला. गॅसची हळूहळू गळती सुरू झाली होती त्यामुळे अधिका-यांनी गॅस रिफिल करण्यासाठी दुसरा टँकर घटनास्थळी बोलावला आणि प्रक्रियेला काही तास लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली असून पोलिसांकडून विविध चोक्या तयार करण्यात आल्या आहेत.












