पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०५ : भावाला मारल्याच्या कारणाहून तरुणावर गोळ्या झाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.ही घटना चाकण पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी प्रसाद राजाराम खांडेभराड ( वय २३ रा. खांडेभराड वस्ती, चाकण ) यांनी सौरभ रमेश कुटे ( वय २३ ), उद्धव रमेश कुटे ( वय २५ ) रा. तुकाईनगर, खेड यांच्या विरूद्ध तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी आणि उद्धव कुटे यांच्यात वाद झाला होता. यामध्ये फिर्यादी यांनी उद्धव यास मारहाण केली.काही वेळानंतर उद्धव हा त्याच्या लहान भावास घेऊन फिर्यादी यांच्या जवळ आला.या कारणावरून उद्धव यांच्या लहान भावाने तू माझ्या भावाला का मारले याचा जाब विचारत बंदुकीतून फायरींग करून फिर्यादी यांना जखमी केले.तसेच फिर्यादी यांच्या मित्रांना दोन्ही भावांनी मिळून हाताने मारहाण करत शिवीगाळ केली आहे.
आरोपीवर भादवी कलम ३०७,३२३,५०४,५०६,३४, आर्म ॲक्ट ३ ( २५ ) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ ( १ ) ( ३ ) चे उल्लंघन १३५ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत.












