भोसरी: भोसरी मधील मोहननगर येथून एका घरातून भोसरी पोलिसांनी ४ लाख ५२ हजारांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ६) रात्री साडेआठ वाजता करण्यात आली.
अभिजित उर्फ पप्पू गंगाराम भोर (वय ४०, रा. भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रभाकर खाडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा अभिजित भोर याने विक्रीसाठी साठवून ठेवला. हा गुटखा त्याने त्याच्या भाड्याच्या खोलीत ठेवला असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत ४ लाख ५२ हजार १५० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.