भोसरी: भोसरी विधानसभा येथील आमदारकी साठी एकंचुक उमेदवार रवी लांडगे यांच्या प्रयत्नातून भोसरी रुग्णालयात नेञ रुग्णांसाठी सुविधांची पूर्तता करण्यात आली. स्मिथ ग्रुप आणि नाम फाउंडेशन यांच्या तर्फे व जनसेवक रवी लांडगे यांच्या विशेष प्रयत्नांतून नवीन भोसरी रुग्णालय येथे नेत्ररोग विभाग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या १० लाख रुपये किमतीच्या अत्यावशक मशिनरी देण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षांपासून भोसरी येथील शासकीय रुग्णलयात नेत्र तपासणी व निदान करण्यासाठी लागणाऱ्या मिशनिंची कमतरता भासत असल्याने येथील स्थानिक रुगुणांना थेट वाय.सी.एम. रुग्णालयात किंवा डी.वाय. पाटील रुग्णालयात जावे लागत होते. जेणेक रुग्णांची या मुळे हिरपोल होत होती.
रुग्णांना होणाऱ्या या त्रासाला लक्ष्यात घेत जनसेवक रवी लांडगे यांनी स्मिथ ग्रुप आणि नाम फाउंडेशन यांच्यासोबत संपर्क साधून नेत्ररोग तपासणी व निदान करण्यासाठी लागणाऱ्या १० लाख रुपये किमतीच्या अत्यावशक मशिनरी या रुग्णालयात उपलब्ध करून दिल्या.
आज दि. १० ऑक्टोबर रोजी या नेत्ररोग विभागाचा उदघाटन समारंभ पार पडला. स्मिथ ग्रुपचे वैभव परदेशी, वैशाली कुलकर्णी दिव्या रामकृष्णन तसेच नाम फाउंडेशन तर्फे गणेश थोरात, शुभांगी नायक भोसरी रुग्णालयाचे प्रमुख ढगे सर, ऋतुजा लोखंडे. प्रकाश लांडगे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला. यामुळे भोसरी परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाला, रुग्णालयातील सर्व डॉकटर, कर्मचारी वर्ग तसेच रुग्णांनी समाधान व्यक्त केले आहे त्याच प्रमाणे भोसरी रुग्णालयातील रुग्णांनी व स्थानिक नागरिकांनी रवी लांडगे यांचे आभार मानले.