अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद (ABMS परिषद), एक शैक्षणिक ट्रस्टची स्थापना नामवंत शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारकांच्या संघाने केली होती. दलित जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने 1907 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात ABMS परिषदेने पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या जनतेला प्रबोधन आणि प्रेरणा देण्याचे प्रशंसनीय योगदान दिले. त्यांच्या प्रेरणेने संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था स्थापन झाल्या. ABMS परिषद महात्मा फुले, कोल्हापूरचे राज्यकर्ते राजश्री शाहू महाराज आणि आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायासाठी लढा देणारे आणि समाजातील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांच्या सक्षमीकरणाचा पुरस्कार करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेते.
बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतून निवृत्त पत्रकारांना देण्यात येणा-या सन्मान योजनेची दरमहा देण्यात येणारी रक्कम ११ हजारा ऐवजी २० हजार करण्यात यावी, अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार सोहळ्यात करण्यात आली होती. यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सन्मान योजनेची रक्कम ११ हजार ऐवजी २० हजार करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज राज्य सरकारने त्या संदर्भातील शासन निर्णय ( जीआर) जारी केला आहे. त्यामुळे आता निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा २० हजार रूपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. या निर्णयाबद्दल मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.
अखेर आज राज्य सरकारने सन्मान योजनेची रक्कम ११ हजार ऐवजी २० हजार करण्यासंदर्भातील शासन निर्णय ( जीआर) जारी केल्याने राज्यातील जेष्ठ पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.अखिल मराठा पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एम एस देशमुख आणि किरण नाईक यांनी यात मोठा लढा दिला. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई यांच्याह मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांचे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.