पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०३ : सोमवार (दि २) रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या छत्रछायेखाली पिंपरी – चिंचवड विभागाची आढावा संपन्न झाली आहे. पिंपरी येथील घरोंदा रेसिडेन्सी येथे सायंकाळी ०५ वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम देशमुख,विश्वस्त किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्री. शरद पाबळे, पिंपरी – चिंचवड पत्रकार संघाचे श्री.अनिल वडगुले, दै. राज्य लोकतंत्रचे संपादक श्री गणेश मोकाशी, पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया संघाचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे आणि इतर पत्रकार देखील उपस्थित होते.
मराठी पत्रकार परिषदेकडून घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पिंपरी – चिंचवड पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारणीची चर्चा करण्यात आली. तसेच पत्रकारांच्या समस्या तसेच परिषदेमार्फत पत्रकारांना होणारी मदत अशा अनेक विषयांवर चर्चा देखील करण्यात आली.
पिंपरी – चिंचवड पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे अध्यक्षपद श्री. अनिल वडगुले यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सर्व पत्रकारांनी एकमताने वाडगुळे यांचे अध्यक्ष पदावर स्वागत केले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्री. शरद पाबळे आणि सर्व पत्रकारांनी पिंपरी – चिंचवड पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. अनिल वडगुले यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.












