पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१७ : मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख, अध्यक्ष मा.श्री शरद पाबळे व जिल्हाध्यक्ष सुनील वाळुंज यांनी दि.१७ रोजी दैनिक राज्य लोकतंत्रच्या पुणे कार्यालयाला भेट दिली.
मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकारांची जुनी,सर्वसमावेशक लोकशाही,सर्वसमावेशक असणारी संघटना आहे. पत्रकारांचे हक्क आणि अन्याय याविरुद्ध लढा देणारी ही सर्वात मोठी संस्था आहे.
या बैठकी दरम्यान उपस्थित मान्यवर आणि दैनिक राज्य लोकतंत्र चे संपादक गणेश मोकाशी यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली.
पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांसाठी संरक्षण कायदा, आरोग्य विषयी समस्या यावर यावेळी चर्चा करण्यात आली. राज्यातील पत्रकारांसाठी वेतन भत्ता, मजेठीया आयोग अशा विविध विषयांवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.
मराठी पत्रकार परिषदेची पुढील वाटचाल, त्यासाठी असणारी कार्यकारणी या अनुषंगाने ही बैठक झाली आहे.
सदर वेळी मान्यवरांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पत्रकारांच्या हितासाठी व त्यांच्या हक्कासाठी ही बैठक घेण्यात आली होती.












