पुणे । प्रतिनिधी
पुणे, दि. १४ :
सध्याच्या आधुनिक युगात प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहत आहे. आता शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकांपर्यंत मर्यादित राहिले नसून त्याला स्किल्सची देखील गरज पडते. त्यामुळे स्किल विषयक शिक्षणाकडे मुलांचा भलताच कल वाढत आहे. अशाच स्किल विषयक शिक्षणाचे मुल्य प्राप्त करून करिअर करण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयात स्कील विषयक शिक्षण हे देण्यात येते. सध्या सगळीकडे प्रसार माध्यमांची चलती आहे. यामुळे अनेक जण माध्यम क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहत असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी महात्मा फुले महाविद्यालय हे उपलब्ध करून देत आहे. बारावीनंतर माध्यमिक क्षेत्रात करिअर करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची संलग्न असलेले पिंपरी चिंचवड मधील हे एकमेव कॉलेज आहे.
मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम अंतर्गत टेलिव्हिजन, जाहिरात क्षेत्र, पत्रकारिता ( वर्तमानपत्र आणि ब्रॉडकास्टिंग ),फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी, फोटो – व्हिडिओ एडिटिंग, डिजिटल मीडिया, फिल्म अँड शॉर्ट फिल्म मेकिंग, ग्राफिक्स डिझायनिंग, विविध कार्पोरेट कंपनी, लेखन, व्हीएफएक्स, दिग्दर्शन या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण दिले जाते.
या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक असणारे त्या क्षेत्रातील तज्ञ लोकांचे मार्गदर्शन, ॲडव्हान्स शूटिंग उपकरणे, प्रशस्त आणि इको फ्रेंडली कॅम्पस यामुळे विद्यार्थी आणि पालक महाविद्यालयाकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येते. महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.
यापुढील काळात गुणवत्ता आणि शैक्षणिक दर्जा कायमस्वरूपी ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. तसेच पिंपरी चिंचवड मधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्याच्या दृष्टीने ही शाखा महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास प्राचार्य प्रो.डॉ.माधव सरोदे यांनी व्यक्त केला.
ज्यांना मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रा.दत्तात्रय बिडबाग ९०२८२१२५५५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नोडल ऑफिसर डॉ. दत्तात्रय हिंगणे यांनी केले आहे.












