माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते मनोहर जोशी यांचे शुक्रवारी 23 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 3.02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये येथे निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते आहेत. तीन टर्म विधानपरिषदेचे आमदार, मुंबईचे महापौर, विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिलेवहिले मुख्यमंत्री अशी अनेक पदं त्यांनी भूषवली होती.
या काळात भ्रष्टाचाराचे आरोप आणि बाळासाहेबांची नाराजी यामुळे मुख्यमंत्री म्हणून आपली कारकीर्द पूर्ण करण्याआधीच त्यांनी राजीनामा दिला होता.
पुढच्या निवडणुकीत त्यांना लोकसभेवर पाठवण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री, लोकसभा सभापती अशी अनेक पदे त्यांनी सांभाळली. उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत देखील त्यांचे नाव चर्चेत होतं.