महाराष्ट्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहेत. असचं एक अनोखं मंदिर पुणे जिल्ह्यात आहे. हे मंदिर वर्षातील १० महिने पाण्याखाली असते. हे मंदिर खूप प्राचीन असून महाराष्ट्रातील हे अनोखे मंदिर पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक येतात. या मंदिराचा थेट छत्रपती शिवरायांशीही संबध आहे. महाराजांनी कोकण-सिंधुदुर्गची मोहिम फत्ते केल्यानंतर ते वाघेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते.
वाघेश्वर मंदिर ७०० ते ८०० वर्ष जुनं आहे. संपूर्ण मंदिर दगडांनी बनवलं आहे. हेमाडपंथी शैलीत असेलेल वाघेश्वर मंदिर पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. पावसाळा आणि त्यांनतरचे काही महिने असं मिळून हे मंदिर १० महिने पाण्याखाली असते. साधारण मार्च महिन्यात पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हे मंदिर पाण्याबाहेर येते. १९६५ मध्ये पावना धरण बांधण्यात आले. १९९१ मध्ये धरणाचा वापर होण्यास सुरुवात झाली. यानंतर हे मंदिर पाण्याखाली बुडाले. पवना धरणाच्या पाण्यात असलेले वाघेश्वर मंदिर तब्बल १० महिले पाण्याखाली असते. वर्षातून फक्त २ महिनेच हे मंदिर पाण्याबाहेर असते. पुण्यातील पावन मवाळ येथे हे वाघेश्वर मंदिर आहे. महादेवाच्या दर्शनासाठी भाविक वर्षभर प्रतिक्षा करत असतात.