पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.०२ : पुण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक – २ कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. तब्बल १ कोटी ४ लाख रुपये किंमतीचा ५२० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रा मध्ये मोठया प्रमाणात गांजा विक्रीसाठी आणला होता. या प्रकरणी महिले सह तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवार (दि.२) रोजी लोणीकंद परिसरात करण्यात आली आहे.
संदिप बालाजी सोनटक्के वय २९ (रा.मु.पो.दहिवली अरिहंत आशिया बिल्डिंग पाली फाटा खोपोली ता.खालापूर जि. रायगड), निर्मला कोटेश्वरी मूर्ती जुन्नरी (वय ३६ रा.चीलाकरलोपेठ, जि. गंटूर राज्य आंध्र प्रदेश), महेश तुळशीराम परीट वय २९ रा. तूपगाव पोस्ट चौक, ता. खालापूर जि. रायगड), असे पकडण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी कि गांजाची तस्करी करणारे दोन इसम व एक महिला असे आंध्रप्रदेशातून एक स्कापीओ व सेलेरिओ गाड्यांना महाराष्ट्र शासनाची पाटी लावून मोठ्या प्रमाणात गांजा महाराष्ट्रात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती लोणीकंद परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली .
त्या अनुषंगाने पोलिसांनी नगररोडवर अर्मसेल इंडिया कंपनीसमोर स्कॉर्पिओ येथे गाडी पकडली. वाहनाच्या झाडाझडतीत १ कोटी ४ लाख ११ हजार रुपये किंमतीचा ५२० किलो ५५० ग्रॅम गांजा, १५ लाख ७१ हजार रुपये किंमतीचा स्कार्पिओ व सेलेरिओ गाड्या, चार मोबाईल, बोर्ड असा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीं विरोधात लोणीकंद पोलीस स्थानकात एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क) ,२०(ब), (ll),(क ) भादवी कलम १७०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे गुन्हे,पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे (गुन्हे),पोलिस उप आयुक्त गुन्हे, सतीश गोवेकर, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक एस. डी. नरके. पोलीस अमलदार शिवाजी घुले, संतोष देशपांडे ,युवराज कांबळे, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, मयूर सूर्यवंशी, मनोज साळुंखे, विशाल दळवी, विशाल शिंदे, सचिन माळवे, दिनेश बाष्ठेवाड, तसेच सिंहगड पोलीस स्टेशन पोलीस अमलदार अविनाश कोंडे, पोलीस अंमलदार ऋषिकेश महल्ले, सलीम तांबोळी, किरण बर्डे यांनी केली आहे.












