पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.२२ : पीएमपीएलच्या बस मधून महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या कट करून चोरणाऱ्या दोघांना वाडिया कॉलेज परिसरातून दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १ कडून अटक करण्यात आले आहे. संतोष ऊर्फ मॅनेजर शरणप्पा जाधव (वय ४१ रा. हडपसर, मु.पो. जि गुलबर्गा कर्नाटक),सुधीर ऊर्फ तुंड्या नागनाथ जाधव (वय ४५ रा.मु. पो. शास्त्रीनगर, जि.ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
पेट्रोलिंग दरम्यान सदर आरोपी हे वाडिया कॉलेज परिसरातून जाणाऱ्या कोरेगाव रस्त्यावर चहाच्या हॉटेल जवळ थांबले असल्याची माहिती पोलीस अंमलदार रवींद्र लोखंडे, आजिनाथ येडे यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलीसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले आहेत. त्याच्या कडून १ लाख २० हजार रुपये किंमतीचे २५ ग्रॅम सोन्याची पटली व कटर असा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सह पोलीस आयुक्त गुन्हे -१ सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस उपनिरीक्षक शाहिद शेख, पोलीस हवालदार बाळू गायकवाड, प्रदीप राठोड, पोलीस नाईक रवींद्र लोखंडे, आजिनाथ येडे, गणेश ढगे, धनंजय ताजणे, मॅगी जाधव, पोलीस आमदार शिवाजी सातपुते, समीत ताकपेरे, महेश पाटील, श्रीकांत दगडे, यांनी केले आहे.












