‘तुतारी’ हाती घेत शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश; अजित गव्हाणे यांच्या विजयासाठी निर्धार
पिंपरी चिंचवड: भोसरी बालाजीनगर येथील हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. महिला सुरक्षा आणि तरुणांच्या हाताला काम या दोन मुद्द्यांवर आम्ही अजित गव्हाणे यांना विजयी करणार असल्याचा निर्धार यावेळी बालाजीनगर येथील उद्योजक शंकर कुऱ्हाडे यांनी सांगितले.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांना भोसरी मतदारसंघातून सर्व स्तरीय पाठिंबा मिळत आहे. याची प्रचिती नुकतीच बालाजी नगर येथे आली स्वयंस्फूर्तीने बालाजी नगर येथील हजारो कार्यकर्त्यांनी मतदारसंघात तुतारी फुंकण्याचा निर्धार केला असल्याचे उद्योजक शंकर कुऱ्हाडे यांनी सांगितले. ते म्हणाले, महिला सुरक्षा आणि तरुणांच्या हाताला काम या मुद्द्याला प्राधान्य देणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार तसेच मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी सांगितले आहे. वारंवार गव्हाणे त्यांच्या प्रत्येक भाषणांमधून या दोन मुद्द्यांवरून नागरिकांना अपील करत आहे. त्यामुळे स्वयंस्फूर्तीने बालाजी नगर येथील हजारो कार्यकर्त्यांसह पक्षामध्ये प्रवेश करत आम्ही अजित गव्हाणे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.
शंकर कुऱ्हाडे यांच्यासह महेंद्र सरोदे, दिनेश कुऱ्हाडे, पिंटू जाधव,सागर ओरसे, विकास देवकर, सुनील वाघमारे, नाना जाधव, भीमा लष्करे, मोहम्मद शहा, रमजान बांदेला, जावेद पठाण यांनी देखील अजित गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. कुऱ्हाडे म्हणाले , बालाजी नगर परिसरात गेल्या 30 वर्षांपासून काम करत आहे. चार वर्षांपूर्वी शहरामध्ये कोविडचे संकट आल्यानंतर आमच्या परिसरातील नागरिकांसाठी आम्हा कार्यकर्त्यांचा संघर्ष सुरू होता. औषधे, अन्नधान्य पुरवण्यासाठी आमची धडपड सुरू असताना आम्हाला अजित गव्हाणे यांनी मदतीचा हात पुढे केला. असा नेता आमच्यासाठी निवडून आणणे आता आमची जबाबदारी आहे असे देखील कुऱ्हाडे म्हणाले.