पुणे | प्रतिनिधी
पिंपरी दि.२२ : भरधाव वेगाने कार चालवत महिलेने एका व्यक्तीला चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवार दि.२१ सकाळी नऊच्या सुमारास मेट्रो ब्रिज खाली,हिंजवडी येथे घडली आहे.
या प्रकरणी दिगंबर अविनाश पाटील यांनी हिंजवडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
निलेश राजेंद्र पाटील वय ३३ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सदर ठिकाणी पाटील हे फिर्यादीसह हिरो होंडा गाडी वरून जात असताना मेट्रो ब्रिज खाली आले असता रोडखोदला होता व चिखल असल्याने गाडी स्लिप होऊन दोघेही खाली पडले. त्यावेळी आरोपी महिलेने भरधाव वेगाने येत पाटील यांच्या अंगावरून कार घालत गंभीर जखमी केले. पाटील यांचा उपचार दरम्यान मुत्यू झाला आहे.
आरोपी विरोधात भा.द.वि कलम २७९,३०४,(अ) ३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम ११९/११७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक बोरकर करीत आहे.












