पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे वानवडी परिसरात घर आहे. घराच्या मालकीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून १० एप्रिल २०२४ रोजी शिवरकर, पिंगळे यांच्यासह अन्य आरोपींनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. आरोपींनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान केला. या प्रकरणी महिलेने न्यायालयात तक्रार देऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. वानवडी पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.