पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०२ : येरवडा खुले जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैदीची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
याप्रकरणी निशा दिलीप कुमार श्रेयकर यांनी आरोपी धनंजय राजाराम दिघे याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
आरोपी हे येरवडा खुले कारागृह येथे शिक्षा भोगत असून त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही.त्यामुळे आरोपी येरवडा खुले कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या हौदाजवळ गेला. तेथे पडलेल्या खराब ब्लेडच्या सहाय्याने त्याने स्वत: च्या डाव्या हातावर जखमा करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार कारागृहातील अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला रुग्णालयात दाखल केले आहे.
आरोपीवर भादवी कलम ३०९ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक महादेव लिंगे हे करत आहेत.












