पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१८ : गरजू, निराधार ज्येष्ठ व्यक्तींसाठी वृद्धाश्रम चालविणाऱ्या नितीन केळकर यांच्या कार्याचा गौरव करून मायदेश फौंडेशनचे संस्थापक अरुण जोशी यांनी वृद्धाश्रमासाठी तीन लाख रुपयांचा मदतीचा धनादेश अर्पण केला.
अरुण जोशी यांनी रविवारी केळकर चालवित असलेल्या दोन वृद्धाश्रमांना भेट दिली. त्या वेळेस जोशी यांनी कोंढव्यातील तीन मजली वृद्धाश्रमाची पहाणी केली आणि तेथील वृद्धांशी संवाद साधला. केळकर यांच्या निरलस, त्यागी आणि परोपकारी कामाचे जोशी यांनी खूप कौतुक केले.
केळकर व त्यांचा मित्रपरिवार अनेक गरजू, निराधार वृद्धांचा पैसे न घेता सांभाळ करीत आहे. प्रसिद्धीपासून दूर असलेल्या केळकर यांच्या या कार्यात समाजाने सहभागी होऊन मदतीचा हात द्यावा, असे आवाहन अरुण जोशी यांनी या प्रसंगी केले. सामाजिक जाणीवेतून भविष्यातही मायदेश फौंडेशनतर्फे मदत देण्याची ग्वाही त्यांनी दिली.












