पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.१० : एका अनोळखी इसमास मारहाण करून करू नका असे सांगितल्याचा कारणावरून सुनेला शिवीगाळ करत पतीला हॉकीस्टिक आणि फाडशीच्या तुकड्याने मारून गंभीर जखमी केले. तसेच हातातील लोखंडी हत्यार हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना येरवडा परिसरातील रामनगर येथे (दि.४) सकाळी साडे सहाच्या सुमारास फॅमिली मेडिकल केमिस्ट जवळ घडली आहे. या प्रकरणी एका पंच्याहत्तर वर्षीय व्यक्तीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गणेश पाटील असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या बाबत अधिक माहिती अशी कि सदर आरोपी हा सकाळच्या सुमारास फॅमिली मेडिकल केमिस्ट जवळ एका अनोळखी इसमास मारहाण करत होता. त्यावेळी फिर्यादी यांच्या सूनने इसमास मारहाण करू नका असे सांगितले असता, आरोपीने मनात राग धरून फिर्यादी यांच्या सुनेला शिवीगाळ केले. तसेच धावून आलेल्या तिच्या पतीला हॉकीस्टिकने व फाडशीच्या तुकड्याने मारून गंभीर जखमी केले.
मारहाणीत जखमी झालेल्या पतीवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी विरोधात भा.द.वि कलम ३२६,३२४,५०४,५०६, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) १३५ आर्म अक्ट ४(२५) क्रिमिनल लॉ ॲमेंटमेंट कलम ३ व ७ अंतर्गत येरवडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक पाटील करीत आहेत.












