पुणे प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड दि. २६ : मार्केटिंगच्या नावा खाली एका तरुणाची ११ लाखाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १६ ते १९ जुलै दरम्यान गहुंजे परिसरात लोंढा बेलमेडो सोसायटीत घडली आहे. या प्रकरणी आनंद गिरजाशंकर नगायेच यांनी शिरगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी आनंद यांना व्हाट्सअप वर ऑनलाईन काम कारण्या संदर्भात बनावट के मार्केटिंग एजेन्सी मधून मेसेज करण्यात आला होता. त्यामध्ये असं लिहिलं होतं की,आमची कंपनी तरुण मुलांना इंस्टाग्रामवरचे फॉलोवर्स वाढविण्या साठी मदत करते. तसेच आमचे काम फक्त इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करणे आणि प्रत्येक अकाउंटला फॉलो केल्यास आम्ही तुम्हाला ७० रुपये देऊ असे सांगण्यात आले. त्यासोबतच एका दिवसात २४ हजार रुपये कमवू शकता अशी ऑफर फिर्यादी यांना देण्यात आली. आरोपींने डेमो दाखवून २७० रुपये अकाउंट मध्ये पाठवतो असे अमिश दाखवण्यात आले.
त्यानंतर आरोपीने फिर्यादीला नाव,वय, कामाचा अनुभव, बँक अकाउंट नंबर असलेला एक फॉर्म भरण्यास सांगितले. सदर माहिती भरताचं वेळोवेळी पैसे पाठवण्यास भाग पाडून जवळ पास सुमारे अकरा लाख रुपये फिर्यादी कडून उकळण्यात आले. या प्रकरणी आरोपी विरोधात शिरगाव पोलीस स्थानकात भा.द.वि कलम ४२०, आय टी ॲक्ट २००० (६६-डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक धुमाळ करीत आहेत.












