पुणे जिल्ह्यातील ३३-मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे.
निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून विवेकानंद सिंग यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०५ असा आहे. श्री. सिंग यांचा संपर्क क्रमांक ९६९९१०४७६५ व ०२०-२९९९७४०८ असा असून निवडणूक पोलीस निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी महेश मतकर यांचा संपर्क क्रमांक ९४०३७२५८०३ असा आहे, असे मावळ लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.