पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २० : सध्या सगळीकडे गणेशाचे आगमन झाल्यामुळे प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पुणे शहरातील वाकड पोलिस स्टेशन मध्ये देखील बाप्पा विराजमान झाले आहेत.

पिंपरी – चिंचवड शहराचे पोलिस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांच्या हस्ते वाकड पोलिस स्टेशन मधील बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
तसेच त्यांनी वाकड मधील गणेश विसर्जन घाट स्थळी भेट देवून तेथील बंदोबस्ताचा आढावा घेतला.












