पुणे प्रतिनिधी
पुणे दि.५ : कोंढवा येथील अश्रफ नगर परिसरात मित्रानेच मित्रावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार (दि.३) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. सदर घटनेत आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी विरोधात कोंढवा पोलीस स्थानकात सद्दाम खान यांनी फिर्याद दिली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अश्रफ नगर येथील योगेश सुपर मार्केट येथे असताना आरोपी सोहेल नवाज शेख उर्फ पठाण (वय २५ रा. गल्ली नं ७ अश्रफनगर, कोंढवा) याने फिर्यादीला तू आमच्याकडे का बघतो असा जाब विचारत दगड मारून शिवीगाळ व मारहाण केली आहे. सद्दाम खान यांच्यावर आरोपीने धार दार हत्याऱ्याने वार करून गंभीर जखमी केले आहे.
या मारहाणीत फिर्यादी यांची बहीण मध्ये पडली असता तिच्या उजव्या हाताच्या बोटावर वार करून गंभीर जखमी केले आहे.
आरोपी विरोधात भा.द.वी.कलाम ३२६,३२३,५०४,५०६,१०९,३४,महा.पो.का.३७(१),१३४,१४२,आर्म अॅक्ट ४(२५) क्रिमिनल लाॅ अमेंडमेंट अॅक्ट क ३व ७ या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजार केले असतात दहा दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.












